मोदी राजकीय स्वार्थासाठी मागास असल्याचे ढोंग करतात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mayawati

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी जर खरंच मागास असते तर त्यांना ‘आरएसएस’ने पंतप्रधान केले असते का, असा प्रश्न करत बसपा नेत्या मायावती यांनी केला आहे. मोदी हे राजकीय स्वार्थासाठी मागास असल्याचे ढोंग करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यांत उत्तर प्रदेशात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी सपा-बसपा गठबंधन जातीयवादी असल्याचा आरोप केला होता. बसपा नेत्या मायावती यांनी शुक्रवारी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. गठबंधन जातीयवादी असल्याचा आरोप हास्यास्पद व अपरिपक्कतेचे लक्षण आहे. मोदी हे मागास जातीचे नाहीत, पण मतं मिळविण्यासाठी ते स्वतःला मागास म्हणवून घेत असल्याची टीका मायावती यांनी केली.

जातीयकादाचे चटके ज्यांनी सोसले आहे ते त्याच राजकारण कधीच करणार नाहीत. जातीयकादाची झळ कधी सोसलेली नाही अशी लोकच त्यावरून राजकारण करतात. मोदी खरोखर मागास असते तर संघाने त्यांना पंतप्रधान केले नसते. माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची भाजपने काय दशा केली हे सगळय़ांनाच माहीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.