वीज कामगारांचा मेडिक्लेम आई-वडिलांसाठी ठरला वरदान, 10 हजार 504 जणांनी घेतले 61 कोटी रुपयांचे उपचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीज कामगारांची मेडिक्लेम पॉलिसी त्यांच्या आई-वडिलांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरली आहे. कामगारांच्या मेडिक्लेम पॉलिसीअंतर्गत स्वतःसह कुटुंबातील पाच जणांना मोफत उपचार मिळतात. त्यानुसार केवळ नऊ महिन्यांत कामगारांच्या 10 हजार 504 आई-वडिलांना तब्बल 61 कोटी 45 लाख रुपयांचे मोफत उपचार घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कामगारांच्या वैद्यकीय खर्चात मोठी बचत झाली आहे.

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज पंपन्यांमध्ये सुमारे 74 हजार 946 कर्मचारी असून ते ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता काम करतात. त्याचा कर्मचाऱयांच्या प्रकृतीवर परिणाम होतो. तसेच वीज वाहिन्यांवर, वीज केंद्रात काम करताना अपघात होतात. त्याची दखल घेत तिन्ही वीज पंपन्या आपल्या कर्मचाऱयांचा मेडिक्लेम काढतात. त्यामध्ये त्यांच्यासह कुटुंबातील पाच जणांना याचा लाभ मिळतो. त्यानुसार 14 मे 2021 ते फेब्रुवारीअखेर 23 हजार 549 जणांनी तब्बल 124 कोटी 43 लाख रुपयांचे उपचार घेतले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक आई-वडिलांची संख्या आहे.

मेडिक्लेमअंतर्गत उपचार घेतलेल्यांची संख्या

आई-वडील    10 हजार 504

कर्मचारी       5 हजार 970

मुले              3 हजार 789

पत्नी             3 हजार 177

इतर             109