शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांना भरघोस मतांनी निवडून आणणारच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पेण

कोकण पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांना भरघोस मतांनी निवडून आणणारच, असा विश्वास केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी पेण येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.

या मेळाव्याला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते, संपर्कप्रमुख विलास चावरी, शिवसेना सल्लागार किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, शहरप्रमुख ओंकार दानवे, संतोष पाटील, प्रमोद घरत, तुकाराम म्हात्रे, काका भोसले, शिवसेनेचे उपजिल्हा अधिकारी आशिष वर्तक, तालुका अधिकारी चेतन मोकल, प्रसाद देशमुख, महिला आघाडीच्या सुनंदा गावंड, दिपश्री पोटफोडे, गिता म्हात्रे, वंदना पाशिलकर, ग्राहक संरक्षणाचे नंदु मोकल, नरेश सोनवणे, गणेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोकणातील पन्नास टक्के पदवीधरांची नोंदणी शिवसेने मार्फत झाली असून कोकण व मुंबई पदवीधर मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकणारच, अशी ग्वाही गिते यांनी यावेळी दिली.

पेण तालुक्यातुन संजय मोरे यांना निर्णायक मते देऊन त्यांना विधान परिषदेवर पाठवणारच, असे वचन किशोर जैन यांनी यावेळी दिले.

पदवीधर युवकांचे प्रलंबित प्रश्न तसेच उद्योगांमध्ये स्थानिक सुशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अश्वासन संजय मोरे यांनी दिले. तसेच शिवसैनिकांनी सोशल मीडिया बरोबर मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्याचा आदेश त्यांनी दिला. शिवसेनाच पदवीधरांचे प्रश्न सोडवू शकते म्हणून शिवसेनेलाच मतदान करा, असे आवाहन मोरे यांनी केले.

खासदार अनंत गिते व शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास चावरे यांच्या मार्गदर्शनानुसार उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय भाऊराव मोरे यांच्या प्रचाराकरीता जिल्हा परिषदेच्या पाच मतदारसंघात व पेण शहर असे सहा विभागप्रमुख निहाय शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, ग्राहक संरक्षण, वाहतूक सेना, शिक्षक सेना यांचे गट स्थापन करून तालुक्यातील २०१४ मतदारांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांचे माहिती पत्रक देऊन त्यांनाच पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघावर शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांना निवडून आणण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढल्याची ग्वाही अविनाश म्हात्रे यांनी दिली.