कोंढव्यात मेफेड्रोन तस्कराला अटक, अमली पदार्थासह 18 लाखांचा ऐवज जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेफेड्रोनची विक्रीच्या तयारीत असलेल्या तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून दीड लाखांचे 52 ग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल, मोटार असा 18 लाखांचा ऐवज जप्त केला. अदनान गुलाम दस्तगीर कुरेशी (वय 32, रा. दस्तगीर मंजील गल्ली नं. 3, शिवनेरीनगर, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

कोंढवा परिसरातील हॉटेलसमोर एकजण मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून अदनान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 लाख 40 हजारांचे मेफेड्रोन, मोबाइल, मोटार असा 18 लाखांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, उपनिरीक्षक एस.डी.नरके, संतोष देशपांडे, संदिप जाधव, प्रशांत बोमादंडी, अप्पा रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, युवराज कांबळे, योगेश मांढरे यांनी केली.