
मेट्रोमॅन ई श्रीधरन भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत आणि विधानसभा निवडणूकही लढवणार आहेत. 21 फ्रेब्रुवारी रोजी केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांच्या नेतृत्त्वाखाली विजय यात्रा काढण्या येणार आहे. या यात्रेत श्रीधरन पक्ष प्रवेश घेतील.
केरळ निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर श्रीधरन पक्ष प्रवेश करणार आहेत. पक्षाकडून त्यांना विधानसभेचे तिकीटही दिले जाणार आहे. दिल्ली मेट्रो सारख्या मोठ्या प्रकल्पात श्रीधरन यांचा सिंहाचा वाटा आहे. दिल्लीसह कोलकाता, कोच्ची मेट्रोचे श्रेयही त्यांच्याकडे जातं. त्यांच्या या योगदानसाठी हिंदुस्थान सरकारने त्यांचा पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन गौरव केला आहे.

























































