मेक्सिकोचा सलग दुसरा विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, रोस्टोव

सलामीच्या लढतीत गतविजेत्या जर्मनीला पराभूत करून मोठा उलटफेर करणाऱ्या मेक्सिकोने शनिवारी फिफा वर्ल्ड कपमधील ‘एफ’ गटात आशिया खंडातील दक्षिण कोरियाला २-१ अशा फरकाने हरवले आणि सलग दुसऱ्या विजयावर मोहोर उमटवली. याच विजयासह मेक्सिकोने अंतिम १६ संघांमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. दरम्यान, पहिल्या लढतीत स्वीडनकडून हार सहन करावी लागणाऱ्या दक्षिण कोरियाला याही लढतीत निराशेचा सामना करावा लागला. यामुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात आले आहे.

या लढतीच्या पूर्वार्धात २६व्या मिनिटाला कार्लोस वेला याने पेनल्टीवर गोल करून मेक्सिकोला आघाडी मिळवून दिली. मेक्सिकोने ती आघाडी पूर्वार्धात कायम ठेवली. उत्तरार्धात हेवियर हर्नांडेझ याने मेक्सिकोसाठी दुसरा गोल करून आपली धमक दाखवली. त्याने याप्रसंगी १०४व्या सामन्यात ५०वा गोल केला हे विशेष.

आजच्या लढती

इंग्लंड वि. पनामा
नोवगोरोड
सायंकाळी ५.३० वाजता

जपान वि. सेनेगल
एकतेरीनबर्ग,
रात्री ८.३० वाजता

पोलंड वि. कोलंबिया
कझान,
रात्री ११.३० वाजता