
जोगेश्वरी पूर्व पूनम नगर येथील पीएमजीपी कॉलनीमधील ‘म्हाडा’च्या 17 इमारतींच्या राबविण्यात येणाऱया समूह पुनर्विकास प्रकल्पाबाबत म्हाडा अधिकाऱयांतर्फे नुकतेच सादरीकरण करण्यात आले. रहिवाशांना प्रकल्पाचे आराखडे, इमारतींचे व पुनर्वसन सदनिकेचे स्वरूप, सोयीसुविधा, पार्ंकग व्यवस्था याबद्दल माहिती देण्यात आली. त्याचबरोबर रहिवाशांचे हस्तांतरण व वारसाहक्क प्रकरणाविषयी शंकांचे निराकरण यावेळी करण्यात आले. याला रहिवाशांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ‘म्हाडा’च्या विशेष प्रकल्प कक्षामार्फत रहिवाशांना प्रकल्पाची माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले. यावेळी म्हाडा अधिकाऱयांनी सांगितले, समूह पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून म्हाडा जुन्या व धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना आधुनिक, सुरक्षित आणि अधिक सुविधा-संपन्न घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पुनर्विकासाअंतर्गत रहिवाशांना 448 चौरस फुटांच्या सदनिका प्रदान करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रकल्पादरम्यान रहिवाशांना आगाऊ घरभाडे व प्रकल्पाअंती कॉर्पस फंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या इमारतींची धोकादायक अवस्था लक्षात घेता रहिवाशांनी तत्काळ म्हाडाकडून घरभाडे प्राप्त करून घ्यावे व इमारती रिकाम्या कराव्यात, असे आवाहन म्हाडामार्फत रहिवाशांना करण्यात आले.
जोगेश्वरी पीएमजीपी कॉलनीत चारमजली 17 इमारती असून 984 गाळेधारकांचे वास्तव्य आहे. या इमारती अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. पावसाळ्यात वारंवार स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने ईपीसी पंत्राटदार म्हणून बी.जी. शिर्पे कन्स्ट्रक्शन या पंपनीची निवड करण्यात आली आहे.




















































