
म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत 4,462 घरांच्या सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी नोंदणीला सोमवारपासून सुरुवात झाली. इच्छुकांना म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर 15 सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.



























































