यूपीआयची उलाढाल 314 लाख कोटींवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ अर्थात ‘यूपीआय’ या सेवेला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. 25 ऑगस्ट 2016 रोजी सुरू झालेली ही सुविधा तब्बल 11 देशांमध्ये पोहोचली आहे. दशकपूर्तीनिमित्त अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यूपीआय व्यवहारांची संख्या 2016-17मधील 1.78 कोटींवरून, 2025-26मध्ये 24,162 कोटींहून अधिक झाली आहे. ही 13,000 पटींनी झालेली वाढ आहे. तर या काळात व्यवहारांचे मूल्य आर्थिक वर्ष 2025-26मध्ये 314 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) यूपीआयला व्यवहारांच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठी रिअलटाइम पेमेंट सिस्टमम्हणून मान्यता दिली आहे. देशाच्या सीमेबाहेर संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, भूतान, श्रीलंका, नेपाळ, सिंगापूर, मॉरिशस, कतार, कंबोडिया, ग्रीस आणि मालदीवमध्ये कार्यरत आहे.