
पाटणा विमानतळावर सोमवारी सकाळी एअर इंडियाच्या विमानाला एक पक्षी धडकला. एआय 1741 हे विमान दिल्लीहून येत होते. विमानात एपूण 164 प्रवासी होते. मागील सात दिवसांत पाटणा विमानतळावर पक्षी धडकल्याची ही दुसरी घटना आहे.
दिल्लीत अपघात; दोन आमदार जखमी
दिल्लीत पीडब्ल्यूडी कार्यालयाजवळ दोन गाडय़ांची भीषण धडक झाली. या अपघातात दोन आमदारांसह सहा जण जखमी झाले. यात दिल्लीतील किराडीचे आम आदमी पार्टीचे आमदार अनिल झा आणि कर्नाटकचे भाजप आमदार अभय पाटील यांचा समावेश आहे.
कचऱ्याचा डोंगर कोसळून 30 ठार
गीनीची राजधानी कोनाक्री येथे शहरातील सर्वात मोठय़ा कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळला असून या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसानंतर कचऱयावरून पाणी वाहू लागल्याने भूस्खलन झाले आणि जवळच्या झोपडय़ा ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या.

























































