
महाराष्ट्रातील उद्योगधंदे अडचणीत सापडले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील अनेक उद्योग अडचणीत सापडले आहेत.त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे हे उद्या बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता लोटे औद्योगिक वसाहतीची पहाणी करणार आहेत.त्यानंतर लोटे येथील उद्योग भवन येथे उद्योजकांसोबत शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतीतील उद्योग बंद पडत आहेत.चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या व्यथा सध्या ऐरणीवर आहेत. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्यातील असूनही जिल्ह्यात म्हणावा तसा औद्योगिक विकास झाला नाही.गेल्या साडे चार वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात एकही नवा उद्योग उभारला गेला नाही.उलट रत्नागिरीतील जे.के. फाईल्स सारखे रोजगार निर्माण करणारे उद्योग बंद पडले आहेत.लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्याही अनेक समस्या आहेत.येथील उद्योजकांच्या उद्योगमंत्र्यासोबत बैठका झाल्या तरीही येथील समस्या सुटलेल्या नाहीत.
शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे उद्या दि.२६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे चार वाजता लोटे ओद्योगिक वसाहतीला भेट देऊन पहाणी करणार आहेत.त्यानंतर उद्योगभवन येथे लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांसोबत ते संवाद साधणार आहेत अशी माहिती शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी दिली.
लोटे औद्योगिक वसाहतीतील समस्या
औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरुस्ती, वाशिष्टी नदीवरील बंधारा उभारणी, स्ट्रीट लाईटची व्यवस्था, नियमित वीज व पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता व सुरक्षितता, तसेच ईएसआयसी सेवा दवाखान्यातील अपुऱ्या सुविधांबाबत चर्चा झाली. याशिवाय ईएसआयसी रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, गाणेखडपोली पुलाचे काम, पेट्रोल व डिझेल बॅरल अथवा पिंपामधून उपलब्ध न होण्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी, लघुउद्योजकांसाठी पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी उद्योजकांची आहे.
लक्ष्मी ऑर्गेनिकला स्थानिकांचा विरोध
जगाने नाकारलेले प्रदुषणकारी प्रकल्प आता कोकणात येत आहेत.पीफास सारखे घातक रसायन उत्पादन करणाऱ्या लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे.



























































