मी स्वतःला कवितेत शोधते!

3147

मी स्वतःला कवितेत शोधते! – निर्मला पटवर्धन, कल्याण

मला कवितेचा छंद शाळेत नाव घातल्यानंतर वाचायला यायला आल्यापासून लागला. त्यावेळी कुणाही कवीची कोणत्याही विषयाची कविता मी अगदी मनापासून वाचून, वडिलांकडून अर्थ समजावून घेत असे. शिवाय शाळेच्या पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अन्य वाचनही करत असे. असे करता करता इयत्ता सातवीमध्ये असताना आपणही कविता लिहू या अशा विचाराने ‘माझी आई’, ‘माझी शाळा’, ‘मी केलेली सफर’ अशा काही विषयांवर कविता लिहू लागले. त्यानंतर कविता लिहितच गेले. आजपर्यंत लिहितच आहे.

आजपर्यंत साधारण अडीचशेच्या आसपास कविता वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये व मासिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. मला वाटतं प्रत्येकाने फावल्या वेळेत कोणता तरी एखादा मनाला समाधान देणारा छंद जोपासणे गरजेचे आहे. मग तो छंद चित्रकला, भरतकाम, शिवणकाम, डिझायनिंग, टाकावूपासून टिकावू शोभेच्या वस्तू तयार करणे, वाचन करणे, कविता लिहिणे, ललित लेख लिहिणे, मुलांना अभ्यासात मदत करणे, समाजकार्य करणे, बागकाम करणे वा इतर आपल्या आवडीचा कोणताही छंद जोपासल्यास प्रत्येकजण मानसिकदृष्टय़ा सक्षम राहील व इतरांना तुच्छ लेखण्यापासून दूर राहील.

 प्रत्येकीचं स्वतःचं असं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या साऱ्याच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमच्या स्वतःतील वेगळेपण फोटोसहित आम्हालाही कळवा. वेगळ्या वेगळेपणास नावासहित प्रसिद्धी मिळेल.

आमचा पत्ता ः श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] या ईमेलवरही पाठवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या