एमआयडीसी अधिकाऱ्यांचा बेफिकीर कारभार, कल्याण-डोंबिवलीतील 125 विहिरी ‘गॅस चेंबर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कल्याण

हरित लवादाने तडाखा दिल्यानंतर डोंबिवली एमआयडीसीतील प्रदूषणकारी कारखान्यांना टाळे ठोकण्यात आले. मात्र एमआयडीसी अधिकाऱयांच्या बेफिकीर कारभारामुळे अनेक कारखानदार अद्यापि प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदी-नाल्यांमध्ये सोडतात. या केमिकल ‘लोच्या’मुळेच गुरुवारी पाच जणांचा हकनाक बळी गेल्याचा आरोप होत असून कल्याण-डोंबिवलीत अजून तब्बल 125 विहिरी ‘गॅस चेंबर’ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ‘मौत का कुँआ’ने नागरिकांमध्ये धडकी भरली आहे.

पाणीटंचाई आराखडा तयार करून 25 कोटींची तरतूद केली. शिकाय खासगी शंभर किहिरींची साफसफाई केली. दुर्घटनाग्रस्त किहिरीची स्कच्छता केली की नाही याबाबत अधिकारी चिडीचूप आहेत. विहीर दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. मात्र पालिका प्रशासन या प्रकरणातून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नगरसेवकांचा आहे.

कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात विहीर साफ करताना त्यातून विषारी वायू बाहेर पडला आणि ऐन दिवाळीच्या तोंडावरच पाच जणांचा हकनाक बळी गेला. अजून अशा किमान 125 विहिरी वापराविना आहेत. कल्याण पूर्व आणि एमआयडीसीतील अनेक केमिकल कंपन्या कोणतीही प्रक्रिया न करता थेट केमिकलमिश्रित सांडपाणी नाल्यांमध्ये सोडतात आणि हेच सांडपाणी विहिरींत मिसळून विषारी कायू तयार होतो. दरम्यान दुर्घटनाग्रस्त विहिरींची सफाई करून आज वायूबाधेची तीव्रता कमी करण्यात आली.

असा होतो विषारी वायू तयार
वर्षानुवर्षे साठलेले पाणी, सांडपाणी, सेंद्रीय कचरा कुजल्याने त्यातून उत्सर्जित होणारे हायड्रोजन सल्फाइड, कार्बन मोनोक्साइड, मिथेन, सल्फरडाय ऑक्साइड, नायट्रोजनडाय ऑक्साइड पाण्यावर साचून राहतात आणि हेच पाणी ढवळल्यानंतर त्यातून घातक असा विषारी कायू तयार होतो. याच वायूची बाधा होऊन पाच बळी गेल्याचा प्राथमिक अहवाल शासनाला दिला असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी धनंजय पाटील यांनी दिली. दरम्यान, पालिका मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राजू लवंगारे यांनी मृतांचे व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठकले आहेत. त्यामुळे हा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, मृत जवानांसह बळी गेलेल्या अन्य तिघांवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

summary- midc causes to poisoned wells in kalyan and dombivli