
सामना प्रतिनिधी । बिकानेर
राजस्थानात बिकानेर शहराजवळ आज दुपारी 2.30वाजता हिंदुस्थानच्या हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान एका पक्ष्याची धडक बसून कोसळले. वैमानिकाने समयसूचकता दाखवून खाली उडी मारल्याने तो बचावला आहे.
Earlier visuals: MiG-21 aircraft on a routine mission crashed earlier today after getting airborne from Nal near Bikaner. The pilot of the aircraft ejected safely. Court of inquiry will investigate the cause of the accident. #Rajasthan pic.twitter.com/wb3tEBF4SD
— ANI (@ANI) March 8, 2019
हे विमान आपल्या नेहमीच्या मोहिमेवर असताना ते बिकानेरच्या शोबा सर की धानी भागात कोसळले. कर्नल पदाच्या समकक्ष लष्करी अधिकार्यामार्फत या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.




























































