Video – राजस्थानात हवाई दलाचे मिग कोसळले, सुदैवाने वैमानिक बचावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानच्या बाडमेर येथे हिंदुस्थानी हवाई दलाचे विमान आज कोसळले. हवाई दलाचे मिग-21 बाइसन लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे अपघातातून वैमानिक सुखरूप बचावला आहे. प्रशिक्षणादरम्यान हे विमान कोसळल्याची माहिती मिळाली आहे.

राजस्थानच्या बाडमेर जिह्यापासून 35 कि.मी. दूर असलेल्या मातसर गावाजवळ संध्याकाळी 5च्या सुमारास हवाई दलाचे मिग विमान कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार वैमानिक सुरक्षित आहे. बाडमेरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, मिग क्रॅश झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर पोलीस प्रशासनाचे पथक आणि अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले. गावकऱयांनी कोसळलेल्या विमानाला लागलेली आग पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने विझवल्याचे वृत्त आहे.