शिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर

शिरोळ तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे  कृष्णा व पंचगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.  प्रशासन  सतर्क झाले असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराची एक तुकडी दाखल झाली आहे.  शनिवारी दुपारपर्यंत  28 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, तर 10 हजारहून अधिक जनावरे छावणीत दाखल झाली आहेत.
पुराच्या पाण्याच्या भीतीने अनेक नागरिक स्वयंस्फूर्तीने जनावरांच्या सह स्थलांतर करीत आहेत, त्यांना प्रशासनही मदत करीत आहे. शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयामध्ये तर तालुक्याच्या दक्षिण भागाकडील  स्थलांतरित नागरिकांची गुरुदत्त साखर कारखाना  येथे  निवास व भोजनाची सोय करण्यात आली आहे. आज दिवसभर पावसाने उघडीप दिली असली तरी कृष्णा व पंचगंगा  नदीच्या पाण्याचा पातळ्या धोकापातळीच्या दिशेने जाताना दिसत आहेत, दरम्यान एसएस ब्रिजेश  यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कराची  एक तुकडीआधुनिक  यंत्रसामुग्रीसह   टाकळीवाडी येथे दाखल झाली आहे.
दरम्यान तहसीलदार सौ.अपर्णा मोरे धुमाळ यांनी  पद्माराजे येथील  कॅम्पमधील स्थलांतरित केलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांची निवास व जेवण बद्दल आस्थेने  चौकशी केली.  पुरबाधीत लोकांना शिरोळ नगरपरिषद  व दानशुर लोक जेवण  देत असल्याबद्दल त्यांची प्रसंशा केली.  कोणत्याही सकंटाला तोंड देण्याकरिता प्रशासन  सज्ज  असल्याचे नायब तहसिलदार संजय  काटकर यांनी सांगीतले.
आपली प्रतिक्रिया द्या