निटुरात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निटूरमध्ये एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्या प्रकरणी राजा धोंडीबा जाधव (रा. निटूर) याच्यावर शिरूर अनंतपाळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून मुलीच्या आईने फिर्याद दिल्याने निटूर पोलिस या सैराट जोडप्याचा शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , निटूर मधलीच राहणारी चौदा वर्षीय अल्पवयीन मुलींशी संधान साधून राजा धोंडिबा जाधव रा. निटूर याने 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान गावातीलच एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले हा प्रकार घरातील वडिलधाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर मुलीच्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठले व माझ्या अल्पवयीन मुलीला राजा यांने पळवून घेऊन गेल्याचा संशय असल्याची लेखी तक्रार दिली त्यामुळे शिरूर अनंतपाळ पोलिसांनी 28 नोव्हेंबर रोजी आईच्या फिर्यादीवरून संशयीत म्हणून राजा जाधव (रा. निटूर) याच्यावर भा.दवि. नुसार कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे .

दरम्यान अद्याप या सैराट जोडप्यांचा पत्ता लागला नसून निटूरचे पोलीस उपनिरीक्षक मलय्या स्वामी हे त्यांचा शोध घेत आहेत. सध्या असे प्रकार वाढल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .