
लातूर – अहमदपूर तालुक्यातील उजना येथून अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या वडिलांनी किनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दिनांक 22 एप्रिल रोजी फिर्यादी हे जेवण करून शेतात झोपण्यासाठी गेले होते. घरी पत्नी व मुलगी अशा दोघीच होत्या. पहाटे 3 वाजता बाथरूमला जाऊन येते म्हणून मुलगी घराबाहेर गेली, मात्र घरी परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. अज्ञात व्यक्तीने मुलीस पळवले म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


























































