
राज्यातल्या सार्वजनिक रुग्णालयात लागणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी आणि वित्त व जीवितहानी रोखण्यासाठी सर्व रुग्णालयात दर तीन महिन्यांनी मॉकड्रील घेण्याचे आदेश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आज जारी केले आहेत. त्याशिवाय आयसीयूमध्ये डॉक्टर व नर्सेसनी सतत उपस्थित असणे गरजेचे असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
मागील वर्षी राज्यातील शासकीय व काही खासगी रुग्णालयांत आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या.
भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर रुग्णालयातील फायर ऑडिटसाठी सरकारने एक समिती स्थापन केली होती. भंडारा जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात बालक केअर युनिटमध्ये आग लागून दहा कोवळ्या जिवांचा बळी गेला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्र हळहळला होता. त्याशिवाय विरारच्या विजयवल्लभ रुग्णालयात तसेच नगरमध्येही आग लागली होती. आगींच्या या घटनांनंतर फायर ऑडिट तसेच विविध स्तरांवर बैठकाही झाल्या होत्या. त्यात फायर ऑडिट तसेच प्रत्येक तीन महिन्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची बाब अधोरेखित झाली होती. रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा कालबाह्य झाल्याचेही निदर्शनास आले होते.
या पार्श्वभूमीवर आगीच्या घटना टाळण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना
सर्व रुग्णालयांत फायर एस्टिंगविशर सक्तीचे फायर सेफ्टी ऑडिटनुसार रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा आवश्यक दर तीन महिन्यांनी मॉकड्रीलमध्ये अग्निशमन यंत्रणा वापरण्याचे प्रशिक्षण मॉकड्रीलमध्ये स्थानिक अग्निशमन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन विभागाचा सहभाग आवश्यक जोखीम असलेल्या भागात अग्निशमन यंत्रणा आवश्यक आग लागल्यास लिफ्टचा वापर नको असे फलक आवश्यक अग्निशमन दल, प्रशिक्षित स्वयंसेवक, आपत्ती व्यवस्थापन कक्षाची माहिती दर्शनी भागात ठळकपणे आवश्यक वॉर्डच्या बाहेर पडणाऱया दरवाजासमोर अडगळ नको. परिसर मोकळा असणे आवश्यक रुग्णालयात स्प्रिंकलर, फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर बसवावे आयसीयूमध्ये सतत डॉक्टर व नर्सची उपस्थिती आवश्यक अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष नको शस्त्रक्रिया पश्चात वॉर्ड, अतिदक्षता विभागात चोवीस तास अधिकारी कर्मचारी उपस्थिती आवश्यक सीसीटीव्हीवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक



























































