मोंड धाडेवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेची धाड, लाखोंचा गुटखा, पान मसाला, तंबाखू साठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

देवगड तालुक्यातील मोंड घाडीवाडी येथे धाड टाकून स्थानिक गुन्हे अन्वेक्षण शाखा व देवगड पोलिसांनी केलेल्या संयुक्तिकरित्या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखा, पान मसाला, तंबाखूचा 1 लाख 42 हजार 567 साठा जप्त केला. या घटनेतील संशयित आरोपी महेंद्रन भास्करन तेवर (42) रा. मोंड घाडीवाडी यांचे विरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी इंगळे यांनी रीतसर फिर्याद देवगड पोलीस स्थानकात दाखल केली आहे. ही कारवाई मोंड घाडीवाडी येथे आरोपीच्या घराच्या पडवीत गुरुवारी सकाळी 12.30 दरम्यान करण्यात आली.

या परिसरात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, तंबाखू याची साठवण विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेक्षण शाखा सिंधुदुर्ग यांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक आर.बी शेळके हेड कॉ ए.के केसरकर,पोलीस नाईक एस एस खाडये,यांचे समवेत देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांचे मार्गदर्शन खाली देवगड पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, हेड कॉ आर.एस. जाधव, ए.जी. आगा, ए.सी.कदम यांनी छापा टाकून आरोपीच्या घराच्या पडवीत मोकळ्या जागेत हा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमाल मध्ये किंतानाच्या पिशवीत केशरयुक्त, विमल पान मसाला 220 पाऊच प्रत्येकी 198 रुपये 1 पाऊच याप्रमाणे 43 हजार 560 रुपये, तसेच केशरयुक्त विमल पान मसाला 79 पाऊच 198 रुपये, 1 पाऊच 15 हजार 642 रुपये,  प्रीमियम रॉयल दुबई एक्सपर्ट क्वालिटी 236 पाऊच प्रत्येकी 100 रुपये, एक पाऊच 23,600, बाजीराव गोल्ड इमपीरिअल पान मसाला 88 पाऊच 120 रुपये, एक पाऊच 10,560 रुपये, मस्तानी टोबॅको 87 पाऊच 30 रुपयांप्रमाणे 2610 रुपये, व्ही-1 टोबॅको असे लिहिलेले 216 पाऊच 30 रुपयांप्रमाणे 6480 रुपये, महक सिल्वर पान मसाला 120 रुपयांप्रमाणे 5400 रुपये, एम-1 जर्दा 46 पाऊच 22.50 रुपयांप्रमाणे 1035 रुपये, व्ही-1 तंबाखू 80 पाऊच 22 रुपयांप्रमाणे 1760 रुपये, केशरयुक्त विमल पान मसाला 266 पाऊच 120 रुपयांप्रमाणे 31920 रुपये असा एकूण 1 लाख 42 हजार 567 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या घटनेसंदर्भात संशयित आरोपी विरुद्ध महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखा ,पान मसाला, तंबाखू व अन्य पदार्थाचे सेवन करणे हे असुरक्षित आहे याची माहिती असतानाही ती विक्री अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम, 26(2)(i)(iv),27(3),(d),चा भंग करून शिक्षा पात्र कलम 59 नुसार भादवी कलम 188,273,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष कदम करीत आहेत.