अरेच्या ! 32 हजारांची मंकी कॅप, सोशल मीडियावर होतेय चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंडी वाढल्याने उबदार कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. लोकं स्वेटर, जॅकेट, मफलर आदी खरेदी करत आहे. मात्र सोशल मीडीयावर सध्या एक मंकी कॅप चर्चेचा विषय बनली आहे. या मंकी कॅपची किंमत ऐकून युजर्सना घाम फुटला आहे. त्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मंकी कॅप एका ट्विटमुळे चर्चेत आली आहे, स्वाती नावाच्या एका तरुणीने या मंकी कॅपचे ट्वीट केले आहे. या पोस्टमध्ये तिने Dolce & Gabbana (D&G) कंपनीची मंकी कॅप शेअर केली आहे. त्याची किंमत 31 हजार 990 रुपये लिहीली आहे. D&G हा एक लक्झरी फॅशन ब्रॅण्ड आहे.

स्वातीने जी पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये या ब्रॅण्डची खाकी रंगाची मंकी कॅप दिसत आहे. 40 हजारांचा मंकि कॅपवर  डिस्काऊंट देत 31 हजार 990 रुपये किंमत दाखवली आहे. ती खरेदी करण्यासाठी तिथे इएमआयचा पर्यायही दिला आहे. तर ही मंकी कॅप D&G च्या वेबसाईटवर सोल्ड दाखवत आहेत.

या पोस्टवर युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंकी कॅपने भलेही थंडी नाही गेली, मात्र त्याच्या किंमतीने नक्कीच घाम सुटेल, काही लोकांनी विचारले, ही कॅप खरेदी कोणी केली असेल. तर अन्य एकाने लिहीले माझ्या आजोबांकडे सेम अशीच कॅप होती त्याची किंमत 20 रुपये होती. तर एका युजरने लिहीले आहे की मी 100-200 वाली कॅप घेणं पसंत करेन. तर आणखी एकाने लिहीले अरे बापरे, डिस्काऊंटनंतर ही किमंत आहे. या पोस्टला आतापर्यंत 1 लाखाहून जास्तवेळा पाहण्यात आले आहे. या पोस्टला अडीच हजार लाईक्स मिळाले आहेत. तर शेकडो युजर्संनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.