रत्नागिरीत पावसाची दमदार सुरूवात; 24 तासात समाधानकारक पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दमदार सुरूवात केली आहे. शनिवारी रात्री मुसळधार पावसाने रत्नागिरीला झोडपले आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 414.90 मिमी पाऊस झाला आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तसेच पुढील पाच दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. शनिवारी सायंकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवारी रात्रभर पाऊस सुरू होता. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 414.90 मिमी पाऊस झाला आहे. त्यामध्ये मंडणगड 23.30० मिमी,खेड 16.20 मिमी, दापोली 17.60 मिमी,गुहागर 50.10 मिमी,चिपळूण 49.40 मिमी,संगमेश्वर 58.20 मिमी,रत्नागिरी 69.90 मिमी,लांजा 54 मिमी आणि राजापूर मध्ये 76.20 मिमी पाऊस झाला आहे.