मान्सून आज केरळात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

नैऋत्य मोसमी वाऱयांनी (मान्सून) श्रीलंकेचा जवळपास निम्मा भाग व्यापला आहे. सध्या केरळसह देशात मान्सूनच्या आगमनास अनुकूल हवामान तयार झाले आहे. त्यामुळे उद्या शनिवारी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.

अरबी समुद्रात केरळ-कर्नाटक किनारपट्टीलगत हवेचे कमी दाबक्षेत्र तयार होत आहे. किनारपट्टीलगत उत्तरेकडे सरकत जाणारी ही प्रणाली आणखी तीव्र होत जाण्याचे संकेत आहेत. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर निर्माण होणाऱया या क्षेत्राच्या वाटचालीवर मान्सूनची प्रगती ठरणार आहे. तर बंगालच्या उपसागरावरील मान्सूनची शाखा रविकारपर्यंत कर्नाटक, गोवा आणि तळकोकणात पोहोचणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

पुण्यात वादळी वाऱयासह पाऊस
पुणे शहरात दिवसभर कडक ऊन होते. सायंकाळी मात्र शहरातील अनेक भागांत सोसाटय़ाचा वारा सुटला. सायंकाळी विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. जुन्नर, आंबेगाव, शिरूर परिसरातील काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

मुंबई, ठाण्यात दिवसभर ढगाळ वातावरण
आज दिवसभर मुंबई ठाण्यात ढगाळ वातावरण होते. शनिवारी आणि रविवारी राज्यभरात मान्सूनपूर्व सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, आज शुक्रवारी ढगाळ वातावरण आणि प्रचंड आर्द्रतेमुळे घामाच्या धारा वाहत होत्या.