
देशात कोरोना संसर्ग वेगाने वाढत असून 24 तासांत विक्रमी 97570 नवीन रुग्ण आढळले. 1201 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान 24 तासांत 81533 रुग्ण बरे होऊन घरी गेले हा सुद्धा विक्रम आहे.
देशातील तीन चतुर्थांशहून अधिक कोरोनाग्रस्त झाले बरे, केवळ 20 टक्के रुग्ण ऍक्टिव्ह
देशात कोरोनाची लागण झालेले तीन चतुर्थांशहून अधिक रुग्ण ठणठणीत बरे झाले असून केवळ 20.7 टक्के रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. त्यांच्यावर प्रभावी उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोरोनाचा रिकव्हरी रेट 77.65 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगलेच सुधारत आहे. सध्याच्या घडीला 36 लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. संसर्गाचे वेळीच निदान, चाचण्यांचे वाढीव प्रमाण तसेच प्रभावी उपचार यांसारख्या उपाययोजनांमुळे देशाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे, असे मंत्रालयाने ट्विटद्वारे स्पष्ट केले.
जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नही!
जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही, प्रभावी औषध उपलब्ध होत नाही तोपर्यंत गाफील राहू नका.‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं ’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. त्यांनी कोरोना अजून संपलेला नाही काळजी घ्या असे सांगितले.जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोवर लोकांनी गाफील राहू नये, असे ते म्हणाले.
























































