
एका आईने आपल्या तीन मुलांना विष देऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ओडिशात घडली आहे. या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला असून आई आणि दीड वर्षाच्या मुलीची परिस्थिती गंभीर आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
ओडिशातील चंदाका येथील ढासल गावात घडली आहे. ही महिला मजूरीचे काम करत होती. आईने आपल्या तीन मुलांना आधी विष दिले त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला असून महिलेची आणि तिच्या दीड वर्षाच्या मुलीची परिस्थिती गंभीर असून कटक येथील रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. म़ृत मुलं तीन आणि साडेचार वर्षांची होती.
पोलीस याप्रकरणी तपास करत असून महिलेने मुलांना विष देऊन आत्महत्या का केली याबाबत नेमके कारण समजलेले नाही. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे हे कृत्य केले असावे असा पोलिसांना संशय आहे.


























































