प्रियकराच्या मदतीने आईनेच काढला मुलाचा काटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । रोहतक

आपल्या प्रेमसंबंधांमध्ये सख्ख्या मुलाचा अडथळा येतो म्हणून आईने प्रियकराच्या मदतीने त्याचा खून केला आहे. हरयाणातील ही घटना असून पोलिसांनी या प्रकरणी आई, तिचा प्रियकर आणि इतर दोघांना अटक केली आहे.

हरयाणामधील जझ्झर जिल्ह्यातील प्रमोद हा 23 वर्षीय तरुण आपली विधवा आई मीना देवी सोबत राहत होता. प्रमोद गुरूग्राममध्ये बाऊन्सर म्हणून काम करत होता. कामाच्या ठिकाणी त्याची ओळख प्रदीप या समवयीन तरुणाशी मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर प्रदीप प्रमोदच्या घरी येऊ जाऊ लागला. या दरम्यानच प्रदीपचे आणि मीना देवीचे प्रेमप्रकरण सुरू झाले. काही दिवसानंतर प्रमोदने नोकरी सोडली. प्रदीप हा आपल्या घरी सारखा येत असल्याने प्रमोदला संशय आला. पुन्हा आपल्या घरी येऊ नको असे प्रमोदने प्रदीपला बजावले.

आपल्या प्रेमसंबंधात आपल्या मुलाचा अडथळा येतो असे कळाल्यानंतर मीना देवी आणि प्रियकर प्रमोदने प्रदीपचा काटा काढण्यास ठरवले.  प्रदीपने आपले मित्र सौरभ आणि भिवाणी या दोघांना सुपारी दिली. सौरभ आणि भिवाणी यांनी 19 फेब्रुवारी रोजी प्रमोदला गोळी घालून ठार केले.

दुसर्‍या दिवशी आईनेच पोलिसांना याबाबत कळावले आणि आपल्यला याबाबत काहीच माहित नसल्याचा बनाव केला. पोलिसांनी जेव्हा सौरभ आणि भिवाणीला बेकायदेशीर बंदूक बाळगल्याप्रकरणी अटक केली  तेव्हा हे सत्य समोर आले. पोलिसांनी चौघांना अटके केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.