4 मुलांची आई प्रियकरासोबत पळून गेली, गावी परतताच नवऱ्याने दोघांना ठार मारलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे मोठी खळबळ माजली आहे. एका व्यक्तीने आपल्या मुलांच्या मदतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असून सर्व आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

ही घटना जलालाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाहर गावात घडली आहे. येथे राहणारे ओम पाल यांची पत्नी ममता हिचे गावातील रमण याच्याशी प्रेमसंबंध जुळले होते. यामुळे तिने 10 वर्षांपूर्वीच चारही मुलांना सोडले आणि प्रियकर रमणपाल सिंगसोबत पळून गेली होती. या दोघांचीही पती ओमपालने खूप शोधाशोध केली, पण काहीच सुगावा लागला नाही.

काही दिवसांनी ओमपाल यांना कळाले की ममता तिच्या प्रियकरासोबत हरियाणातील पानिपतमध्ये काम करत आहे. मात्र लॉकडाऊननंतर ममता आणि तिचा प्रियकर गावात राहू लागले. बुधवारी सायंकाळी सात वाजता रमण पाल हे त्यांच्या शेताकडे जात होते. ओमपाल याने त्याच्या साथीदारांसह घेराव घालून त्याची हत्या केली. या दरम्यान ममतालाही ओमपाल याने ठार मारले. यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.