पेण शहरात मुलीसह आईची गळफास लावून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suicide

सामना प्रतिनिधी । पेण

पेण शहरांतील झिराळ आळी येथे गतिमंद मुलीसह आईने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

संस्कृती डंगर (15) ही मुलगी गतिमंद होती. त्यामुळे तिची आई सविता डंगर ही नेहमी निराश व चिंतेत असायची. त्याच नैराश्येतून त्यांनी आपली मुलगी संस्कृती डंगर हिच्यासह घरात कोणीही नसताना पंख्याला लटकवून आत्महत्या केली. या घटनेमुळे येथे हळहळ व्यक्त होत आहे.

याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय धुमाळ हे करीत आहेत.