दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक; शिक्षकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेवराई येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक धोंडराई कॅम्प येथून सकाळी 10 च्या सुमारास गेवराईकडे येथे येत असताना समोरून येणाऱ्या मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात या शिक्षकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना गेवराई – उमापूर रोडवर धोंडराई येथील रामनगर तांडा येथे घडली.

गेवराई येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक संजय मारोती गीते हे धोंडराई कॅम्प येथून सकाळी 10 च्या सुमारास आपल्या मोटारसायकल (MH 23 M- 4097) वरून गेवराई कडे येत असताना समोरून (MH -23-AZ -5751) मोटारसायकलवरून रितेश हाराळे (वय 20) हा आपल्या मोटारसायकलवरून गेवराईकडून उमापूरकडे भरधाव वेगात जात असताना दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने यात शिक्षक संजय मारोती गीते (वय 50 वर्ष) यांचा उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला तर रितेश हाराळे हा युवक गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पो.ना. क्षीरसागर यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून शिक्षक संजय गीते यांच्या मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.