
मध्य प्रदेशमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणीच्या स्वप्नात नाग देवता आला. तेव्हा ही तरुणी सकाळी मंदिरात हजर झाली आणि नागाशी लग्न करण्याचा हट्ट धरू लागली. नागमंदिरातही पुजार्यांनी तिचे विधीवत लग्न लावून दिले.
मध्य प्रदेशच्या परसिया जिल्ह्यातील ही घटना आहे. एका तरुणीच्या स्वप्नात एक नागदेवता आला आणि त्याने लग्नाची इच्छा बोलून दाखवली. तरुणी सकाळी उठून नागदेवता मंदिरात पोहोचली आणि नागदेवताशी लग्न करण्याचा हट्ट धरू लागली. पाहता पाहता ही बातमी संपूर्ण पंचक्रोशीत पोहोचली. तिच्या लग्नाची लगोलग तयारी करण्यात आली. तरुणीला नववधूप्रमाणे सजवण्यात आले. तरुणी आणि संपूर्ण ग्राव नागदेवताची वाट पाहत बसले. पण नागदेवत काही प्रकट झाले नाही. अखेर तरुणीने अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेतले आणि लग्न उरकले.






















































