मराठा आरक्षणावरील चर्चेस पंतप्रधान मोदींची टाळाटाळ, संभाजीराजेंच्या 3 पत्रांना उत्तरच नाही

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीनंतर केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी मराठा समाजामध्ये जोर धरू लागली आहे. यासंदर्भात खासदार संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चा करण्यासाठी तीन पत्रे पाठविली, मात्र यासंदर्भातील एकाही पत्रास पंतप्रधानांकडून उत्तर आलेली नाही. यामुळे मराठा आरक्षणावरील चर्चेस पंतप्रधान मोदी टाळाटाळ करीत असल्याची भावना मराठा समाजात निर्माण झाली आहे.

खासदार संभाजीराजे यांनी नरेंद्र मोदी यांना तीन पत्रे पाठविली, या पत्रांवर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या सह्याही होत्या. मात्र पत्रांना अजून उत्तर मिळालेले नाही. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार्या ऍटर्नी जनरलबाबत सरकारने निर्णय घेतला आहे. ऍटर्नी जर्नलचा निर्णय आणि सरकारचा निर्णय हा एकच असायला हवा. कारण ऍटर्नी जनरल हा सरकारचा माणूस असल्याचे संभाजीराजे म्हणाले. त्याचप्रमाणे राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजासाठी 9 आश्वासने दिली त्यांची पूर्तता कशी होणार हे पटवून सांगावे अन्यथा 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरीय गोलमेज परिषदेत घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या