परिवहन विभागाला सरकारी माल वाहतुकीची परवानगी, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पाऊल

विविध शासकीय विभागांमार्फत खासगी माल वाहतूकदारांकडून जी वाहतूक करण्यात येते त्यातील 25 टक्के माल वाहतुकीचे काम राज्य परिवहन महामंडळास देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज घेण्यात आला.

राज्य परिवहन महामंडळाकडे उपलब्ध माल वाहतुकीची वाहने विचारात घेता राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत निविदा प्रक्रिया करून खासगी माल वाहतूकदार यांच्या मार्फत जी वाहतूक करण्यात येते त्यामध्ये राज्य परिवहन महामंडळास 25 टक्केपर्यन्त माल वाहतुकीचे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासंदर्भात मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करून अंमलबजावणीबाबत तसेच राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत सर्वंकष विचार विनिमय करून उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत. महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत अवजड व प्रवासी शासकीय वाहनांची देखभाल व दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या