एमटीव्हीची ‘एमटी स्टाइल सुपरस्टार’ स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पॅण्टालून्स आणि एमटी इंडियाने नुकतेच  मालाड येथील इन्फिनिटी मॉलमध्ये एमटी पॅण्टालून्स स्टाइल सुपरस्टार्ससाठी ऑडिशनचे आयोजन केले होते. या ऑडिशन्सच्या निमित्ताने फॅशन डिझायइनरर्सना फॅशन आणि वैयक्तिक स्टाईलसाठी त्यांचे कौशल्य, प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळाले. अभिनेत्री सना सईद आणि एमटीव्ही व्हिजे क्रिसॅन बॅरोट्टोने यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. या स्पर्धेत मुंबईतील सर्वात स्टायलिश व्यक्ती म्हणून सागर मदत, काजल रावत, शाहरुख खान, सय्यद बरी इमाम, तेजल शिंदे, प्रिया सिंग, गिथिका राणे यांची निवड करण्यात आली, तर वैष्णवी शेटय़ेचा लिवा फ्ल्यूईड सुपरस्टार ऑफ मुंबई हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.