मुलाच्या लग्नानिमित्त मुकेश अंबानींनी पोलिसांना वाटले 50 हजार मिठाईचे पुडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी त्यांचा मुलगा आकाश याच्या लग्नानिमित्त मुंबई पोलिसांचे तोंड गोड केले. अंबानी यांनी 50 हजार पोलिसांना मिठाईचे पुडे वाटले आहेत. आकाश अंबानी आणि श्लोका मेहता हे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यानिमित्त मुकेश अंबानी यांनी मुंबई पोलिसांना सुखद धक्का दिला. अंबानी यांनी प्रत्येकी एक किलो मिठाईचे 50 हजार पुडे मुंबई पोलीस दलास दिले आहेत.

अंबानी यांच्याकडून मिळालेली मिठाई दर्जेदार असून उत्तम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अंबानी यांच्याकडून शहरातील प्रत्येक पोलीस ठाणे तसेच अन्य शाखांच्या अधिकारी व कर्मचाऱयांना मिठाईचे वाटप करण्यात आले. 9 ते 11 मार्च असे तीन दिवस आकाश आणि श्लोका यांचा लग्नसोहळा चालणार आहे.