विज्ञान परिषदेचा वर्धापन दिन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी विज्ञान परिषदेचा ५५ वा वर्धापन दिन रविवार, २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता साजरा होणार आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अरविंद रानडे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून ते ‘विज्ञानाच्या दृष्टीतून – आत्मनिर्भर हिंदुस्थान’ या विषयावर बोलतील. या कार्यक्रमात परिषदेतर्फे देण्यात येणारे विज्ञान प्रसार पुरस्कार, कृषी पुरस्कार, उत्तम विज्ञान पुस्तक इत्यादी पुरस्कार व पारितोषिकाचे वितरण तसेच दोन ई-पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. स्मिता पोतनीस विज्ञान कथाकथन तर धनश्री करमरकर विज्ञानकथा वाचन करतील. विज्ञान परिषदेचे https://mavipa.org या संकेतस्थळावर हा कार्यक्रम बघता येईल.