मुंबईत दिवसभरात 612 कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत आज दिवसभरात 612 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 599 कोरोनाचे रुग्ण सापडले. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 525 दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईतील विविध रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 407 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 95 हजार 344 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर आले आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर

कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात आज 2 हजार 422 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 95.91 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात दिवसभरात 3 हजार 670 कोरोना रुग्णांची नोंद झाली.