पाकिस्तान प्रेमावरून अक्षय झाला ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

बॉलीवूडमध्ये देशप्रेमावर चित्रपट करून स्वत:ची देशभक्त अशी ओळख निर्माण करणारा अभिनेता अक्षय कुमार याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अक्षयचा एक जुना व्हिडीओ सोशल साईटवर व्हायरल झाला आहे. त्यात पाकिस्तानमध्ये सर्वाधिक प्रेम मिळतं असं अक्षय बोलतं असल्याचे दिसत आहे. अक्षयचे हे पाकिस्तान प्रेम त्याच्या चाहत्यांना आवडलं नसून त्यांनी अक्षयची देशभक्ती ढोंग असल्याचं म्हणून त्याच्यावर कडाडून टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वीच अक्षयचा केसरी नावाच्या चित्रपटाचा एक पोस्टर रिलीज झाला होता. त्यातही अक्षय देशभक्ताचीच भूमिका करत असल्याचे समोर आले होते. यामुळे त्याच्या चाहत्यांनी त्याच्या देशभक्तीवर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र या पोस्टर रिलीज नंतर अक्षयचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका मुलाखतीत त्याने “पाकिस्तानमध्ये माझे चित्रपट  सर्वाधिक चालतात. येथे जेवढं प्रेम मिळत ते खचितच दुसरीकडे मिळतं” असं म्हटताना तो ऐकयला मिळतं. अक्षयने पाकिस्तानची केलेली ही स्तुती त्याच्या चाहत्यांना रुचली नाही. जर हेच विधान शाहरुख, सलमान किंवा आमिरने केलं असतं तर त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला असता असं अक्षयवर टीका करणाऱ्यांनी म्हटलं आहे.  तर अक्षय कुमार पैशांसाठी काहीही करू शकतो असं म्हणतं नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, याधीही अक्षयचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात चित्रपटाच्या प्रमोशन साठी कॅनडात गेलेल्या अक्षयने टोरंटोचं त्याचं घरं असून बॉलीवूडमधून निवृत्ती घेतल्यानंतर सर्वसंपत्ती घेऊन कॅनडातच स्थायिक होणार असल्याचं जाहीर केल्याचे व्हिडीओत दिसलं होतं.