
संपूर्ण जून महिना जवळपास कोरडा गेल्यावर आता पुढील चार-पाच दिवस मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस अंदाज वर्तविला आहे. हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा जिह्यात ४ जुलै पाऊस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. आभाळाकडे डोळे लावून पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी आणि तहानलेच्या जनता पाऊस दिलासा देणार आहे.
हवामान खत्याने दिले माहितीनुसार, ४ जुलैपर्यंत मुंबईसह कोकणमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. २ आणि ३ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात तर, २ ते ४ जुलै या कालावधी पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिह्यात मुसळधार पावसाचे अंदाज आहे. विदर्भात नागपूरसह काही जिह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ दिले गेले आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही पाऊस सुखावणार आहे. अनेक भागांमध्ये ‘यलो अलर्ट’ दिली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहेत. त्याच्या प्रभावामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाले आहे.
जुलैमध्ये कमीच बरसणार जुलैच्या पहिल्या आठवडय़ात दमदार पावसाचा अंदाज असला तरी संपूर्ण महिनाभरात पाऊस कमीच बरसणार आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये देशभरात सरासरी २८०.४ मिलीमीटर एवढा पाऊस पडतात. त्याच्या ९४ टक्केच पावसाची शक्यता आहेत.
रविवारपासून मुंबईत धो धो बरसला मुंबईला रविवारपासून पावसाने चिंब भिजवले आहेत. महिनाभर पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱया मुंबईकरांना या पावसाने मोठी दिलासा दिला आहे. पश्चिम उपनगरासह दादर, वरळी, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर इत्यादी भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावले. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत शहरात सरासरी २६.०३ मि.मी., पूर्व उपनगरात ४०.६२ मि.मी. आणि पश्चिम उपनगरात २२.४७ मि.मी. पावसाची नोंद झाले. कुलाबा वेधशाळेत ३१.८ मि.मी., तर सांताक्रुझ येथे २७.८ मि.मी. पाऊस झाली.






























































