पालिका वैधानिक समित्यांच्या नव्या सदस्यांची नावे जाहीर

पालिकेच्या वैधानिक समित्यांवरील नव्या सदस्यांची नावे आज महासभेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केली. यानुसार स्थायी समितीत पाच नव्या चेहऱयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये माजी महापौर शिवसेना नगरसेवक प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, भाजपचे भालचंद्र शिरसाट, उज्ज्वला मोडक, हरीष भांदिर्गे आणि आशा मराठे यांचा समावेश आहे.

पालिकेच्या स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती, ‘बेस्ट’ अशा वैधानिक समित्यांच्या 50 टक्के सदस्यांची मुदत दर दोन वर्षांनी 1 एप्रिल रोजी संपते. यावेळी मुदत संपल्याने नवीन सदस्यांची निवड केली जाते. मात्र यावर्षी मार्चपासून कोरोनाच्या प्रभावामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र या निवडणुका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यानुसार शिक्षण, स्थायी, बेस्ट, सुधार समितीसह अन्य समित्यांच्या निवडणुकांना 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी नवीन सदस्यांची नावे आज ऑनलाईन पद्धतीने झालेल्या सभागृहात महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केली. शिक्षण समितीच्या 11, स्थायी समितीच्या 13, सुधार समिती 13 व बेस्ट समिती सदस्यांची नावे पेडणेकर यांनी जाहीर केली.

आपली प्रतिक्रिया द्या