गोवंडीत शौचालयाच्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवंडीत शौचालयाच्या टाकीत पडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. आरिफ नसुल्लाह शेख (4) असे त्या मुलाचे नाव आहे. गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात सायंकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी ही घटना घडली. हा मुलगा शौचालयाच्या टाकीत पडल्याचे कळताच स्थानिक रहिवाशांनी त्याला बाहेर काढले. यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. आरिफचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱयाची मदत घेण्यात आली. आरिफ हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. दरम्यान, संबंधित शौचालयाचे बांधकाम सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याचे समजते. त्यामुळे मुलगा टाकीत पडलाच कसा याची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.