मुंबई सेंट्रल स्थानकात लोकल रुळावरून घसरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर रिकामी असलेल्या लोकलचे चाक रुळावरुन घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. ही घटना मुंबई सेंट्रल स्थानकावर घडली आहे. मात्र आता चाक घसरलेली लोकल बाजूला करण्यात रेल्वेला यश आले आहे.

मुंबई सेंट्रलवरुन ही लोकल बोरीवलीला जात होती. मुंबई सेंट्रल स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर लोकलचे चाक रुळावरुन घसरले. त्यामुळे पश्चिन रेल्वेच्या डाऊन मार्गावरील वाहतूक अर्धा ते पाऊण तास विस्कळीत झाली होता. मुंबई सेंट्रलपासून मरीन लाईन्सपर्यंत लोकलच्या रांगा लागल्या होत्या. चर्चगेट ते बोरीवली स्लो लोकल काहीकाळ बंद ठेवण्यात आली आहे.