बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनातिकीट प्रवास करणाऱया फुकटय़ा प्रवाशांकडून तसेच बेकायदेशीरपणे सामानाची वाहतूक करणाऱयांविरोधात मध्य रेल्वेने राबवलेल्या मोहिमेत एप्रिल 2019 ते फेब्रुवारी 2020 या दहा महिन्यांच्या काळात तब्बल 182 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. एकटय़ा फेब्रुवारी महिन्यातच अशा कारवाईत मध्य रेल्वेने 14.41 कोटींचा दंड वसूल केला आहे. तर गेल्या वर्षी फेब्रुवारी 2019मध्ये 11.92 कोटी दंड वसूल झाला होता. म्हणजे यंदा दंडाच्या रकमेत 20.88 टक्के वाढ झाली आहे. एप्रिल 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान विनातिकीट प्रवास करणारे आणि बेकायदेशीरपणे सामानाची वाहतूक करणाऱयांकडून 182.50 कोटींचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 158.93 कोटी रुपयांचा दंड वसूल झाला होता. म्हणजे यंदा दंडाच्या रकमेत 14.83 टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदाच्या फेब्रुवारी 2020मध्ये रिझर्व्ह तिकिटाच्या बेकायदेशीर हस्तांतरणाचे 266 गुन्हे दाखल होऊन 1.46 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.