मुंबईत कोरोनाचे 407 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 407 रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला. त्यापैकी 384 रुग्णांना कोणतीही लक्षणे नव्हती. 23 जणांना रुग्णांलयात दाखल करण्यात आले तर एकाला ऑक्सिजन बेड देण्यात आले.

दिवसभरात 163 जण कोरोनामुक्त झाले. मात्र, मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या वाढली असून ती 2 हजार 977 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचे आज 1 हजार 5 रुग्ण सापडले तर 4 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 44 जण कोरोनामुक्त झाले असून सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 968 वर पोहोचली आहे.