
कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत आज दिवसभरात 239 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 434 रुग्ण सापडले असून 9 जणांचा मृत्यू झाला.
मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणा?ऱया 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 195 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणा?ऱयांची एकूण संख्या 2 लाख 79 हजार 882 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 359 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 7 हजार 364 वर पोहोचली आहे.
राज्यात 4,286 जण कोरोनामुक्त
कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश येत असून राज्यात आज दिवसभरात 4 हजार 286 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 94.75 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 3 हजार 438 कोरोना रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरात कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.54 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 34 लाख 43 हजार 229 चाचण्या झाल्या असून 19 लाख 71 हजार 552 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.





























































