
मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने दिल्लीत जाऊन धडक कारवाई केली. नेपाळहून चरस आणून तो हिंदुस्थानातील विविध शहरांत विकणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पकडले. आरोपीकडून 19 किलो वजनाचा व 95 लाख रुपये किमतीचा चरस साठा जप्त करण्यात आला.
9 तारखेला आर. ए. किडवाई मार्ग परिसरात युनिट-3 चे पथक गस्त घालत असताना त्यांना एक तरुण दुचाकीच्या डिकीमध्ये चरससदृश पदार्थ ठेवताना दिसून आला. त्यामुळे एपीआय प्रकाश लिंगे व पथकाने राजा देवेंद्र (34) या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यात दोन किलो 747 ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा चरस साठा मिळून आला. मूळचा दिल्लीचा असलेल्या राजाला युनिट कार्यालयात आणून चरसबाबत चौकशी केली असता हा चरस त्याने दिल्लीत राहणाऱ्या कृष्णा पटेल ऊर्फ कल्लू (29) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार उपायुक्त प्रशांत कदम व प्रभारी निरीक्षक काकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शामराव पाटील, एपीआय प्रकाश लिंगे तसेच सरोदे, भास्कर गायकवाड, राहुल पाटील या पथकाने कृष्णाचा शोध सुरू केला. तांत्रिक बाबींच्या माध्यमातून कृष्णाला संपका&त आणल्यानंतर पोलीस बनावट ग्राहक बनले आणि कृष्णाकडे चरसची मागणी केली, पण सराईत गुन्हेगार असलेला कृष्णा सीमकार्ड व लोकेशन बदलून बोलत होता. मात्र तरी पोलिसांनी तांत्रिक काwशल्याने कृष्णावर पाळत ठेवली. अखेर ठरल्याप्रमाणे 19 किलो चरस विकण्यासाठी कृष्णा तयार झाल्यानंतर पोलीस पथक दिल्लीला रवाना झाले. नेपाळहून आणलेला 19 किलो चरस विकण्यासाठी घेऊन येत असतानाच पोलीस पथकाने त्याला नॉर्थ दिल्लीत पकडले. त्याच्याकडून तब्बल 95 लाख पिंमतीचा चरस साठा जप्त करण्यात आला.
पॅरोलवर आल्यानंतर…
कृष्णा हत्येच्या गुह्यात तिहार कारागृहात शिक्षा भोगत होता. कोरोना काळात पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा कारागृहात परतलाच नाही, पण त्याने ड्रग्जची खरेदी-विक्री करण्यास सुरुवात केली. नेपाळहून चरस आणून तो हिंदुस्थानात विकत होता असे पोलीस सूत्रांकडून समजते. कृष्णाचा साथीदार राजा याच्या विरोधात एनडीपीएसचे दोन गुन्हे दिल्लीत दाखल आहेत.

























































