गौतम नवलखा, तेलतुंबडेना हायकोर्टाचा दिलासा कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या गौतम नवलखा तसेच आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाने या दोघांच्या जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी घेण्याचे निश्चित केले असून शुक्रवारपर्यंत अटक करू नये असे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत.

भीमा-कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नवलखा, तेलतुंबडे यांच्यासह काही जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा यांनी हायकोर्टात अर्ज केला. हायकोर्टाने अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला, परंतु 12 नोव्हेंबरपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. ही मुदत संपल्याने त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती.