पदपथावरील लोखंडी खांब व्हीलचेअरला अडथळा, राज्य शासन, पालिकेला जारी केली नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील पदपथांवरील लोखंडी खांब व्हीलचेअरला अडथळा ठरत आहेत. याची दखल घेत हायकोर्टाने राज्य शासन व पालिकेला नोटीस जारी केली.

अॅड. जमशेद मिस्त्री यांनी ही बाब मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली. ऍड. मिस्त्राr यांना 22 सप्टेंबर 2023 रोजी करण सुनील शहा यांनी मेल पाठवला होता. ते व्हीलचेअरचा वापर करतात. मुंबईतील काही पदपथांवर लोखंडी खांब लावले आहेत. पण याचा त्रास व्हीलचेअर वापरणाऱयांना होत आहे, असे या ई-मेलमध्ये नमूद केले आहे.

अॅड. मिस्त्री यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ाची खंडपीठाने गंभीर दखल घेतली. हे प्रकरण स्युमोटो याचिका म्हणून न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करून घेतले. या प्रकरणात ऍड. मिस्त्री यांची ऍमक्यस क्युरी म्हणून नियुक्ती केली जात आहे. राज्य शासन व पालिकेला नोटीस जारी केली जात आहे. त्याचे उत्तर पालिका व राज्य शासनाने सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी 18 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.