मुंबईला 9 नवे न्यायाधीश मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असून मुंबईला 9 नवे न्यायाधीश मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. सरन्यायाधीश शरद बोबडे आणि न्यायमूर्ती एन. व्ही. रामन्ना आणि आर. एफ. नरीमन यांची या बैठकीस उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अरुणा एस. पै, शैलेश पी. ब्रह्मे, कमल आर. खटा, शर्मिला यू. देशमुख, अमीरा अब्दुल रझाक, संदीप व्ही. मार्णे, संदीप एच. पारीख, सोमशेखर सुंदरसन आणि महेंद्र एम. नेरळीकर या नऊ वकिलांची न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली. राजेश एन. लड्डा, संजय जी. मेहरे, जी. ए. सानप आणि एस. जी. दिगे या न्यायिक अधिकाऱयांची उन्नती करण्याची शिफारस केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांची 94 पदे मंजूर असून त्यातील 30 पदे अद्याप रिक्त आहेत.