
सामना प्रतिनिधी। मुंबई
तोंडी परीक्षा नसल्यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच अकरावीत प्रवेश मिळणार आहे. यानुसार सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचेदेखील फक्त लेखी परीक्षेतील गुण अकरावी प्रवेशावेळी ग्राह्य धरण्यात यावेत, अशी सूचना काही मुख्याध्यापक व पालकांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
मंगळवारी शालेय शिक्षणमंत्र्यांसोबत मुख्याध्यापक व काही पालकांची बैठक पार पडली. मुख्याध्यापक आणि पालक यांनी दिलेल्या या सूचनेसंदर्भात राज्य सरकारच्या कतीने केंद्रीय मनुष्यबळ किकासमंत्री, त्याचप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई बोर्ड यांच्याशी चर्चा करून लककरच निर्णय घेण्यात येईल, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
तर प्रवेश समान पातळीवर होतील
एसएससी, सीबीएसई, आयसीएसईसह अन्य शिक्षण मंडळांतील विद्यार्थ्यांचे फक्त लेखी परीक्षेत मिळालेले गुण अकरावी प्रवेशासाठी गृहीत धरल्यास प्रवेश समान पातळीवर होतील, असा सूर या बैठकीतून आला आहे.
अकरावी प्रवेशात सीबीएसई, आयसीएसईचे साडेचार टक्केच विद्यार्थी
अकरावी प्रवेशात आयबी, आयजीसीएसईचे 7 ते 9 टक्के विद्यार्थी तसेच सीबीएसई, आयसीएसईचे सुमारे साडे चार टक्के विद्यार्थीच असतात. याहून ही संख्या जास्त नाही. प्रवेशप्रक्रियेत केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळते व एसएससीचे विद्यार्थी मागे राहतात. ही केवळ अनाठायी भीती असल्याचे तावडे यांनी या बैठकीत सांगितले. यंदाच्या परीक्षेत दहावीच्या विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन झाले असून त्याआधारे विद्यार्थ्यांनी पुढील अभ्यासक्रम निवडावा असे स्पष्ट करतानाच कोणत्याही विद्यार्थ्याकर अन्याय होणार नाही, याची दक्षता राज्य सरकारकडून घेण्याची हमीदेखील विनोद तावडे यांनी दिली.



























































