मुंबई पोलिसांनी सुदान नागरिकांचा हरवलेला ऐवज २४ तासांत परत मिळवून दिला.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई पोलिसांनी आणखी एक धडाकेबाज कामगिरी केली आहे. मुंबईतल्या कुलाबा पोलिसांनी दोन सुदान नागरिकांचा हरवलेला ऐवज अवघ्या २४ तासांत परत मिळवून दिला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र मुंबई पोलिसांचे कौतुक होत आहे.

मोहमद अब्दुल युसूफ अल हसन (२२) आणि अब्दुल रहिम बसिर याकूब ( ३९) हे दोघे सुदान नागरिक बहरीन येथून मुंबईत व्यवसयासाठी आले होते. मंगळवारी सहार विमानतळाबाहेरून त्यांनी कुलाब्याला जाण्यासाठी टॅक्स पकडली, मात्र कुलाबा येथील एका हॉटेलमध्ये उतरताना त्यांच्याजवळील पैसे आणि पासपोर्ट असलेली बॅग ते घेण्यास विससरले. याबात त्यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि तपासाची चक्रे फिरली.

कुलाबा पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत सदर टॅक्सीचा शोध लावला. यासाठी कुलाबा पोलिसांनी जवळपास २० ते २५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डींग आणि ७०० पेक्षा जास्त टॅक्सी तपासून अखेर हरवलेला ऐवज परत मिळवला. या सामानात सुदान नागरिकांचे पासपोर्ट,

१८७००० रुपये किंमतीचे दुबईचे चलन, तसेच २ लाख रुपये किंमतीचे २५०० युरो, ७०० अमेरिकन डॉलर ज्यांचे हिंदुस्तानातील मूल्य ४८००० रुपये असून इतर मौल्यवान वस्तु आणि कपड्यांचा समावेश होता. हा सर्व ऐवज कुलाबा पोलीसांनी संबंधीत सुदान नागरिकांना परत केला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांची ही कामगीरी नक्कीच प्रेरणादायी अशीच म्हणावी लागेत.